Sunday, April 20, 2008

आज आय पी एल च्या म्याचेस बघत होतो

पैसा ओतालाय नुसता सगळ्या बाजुन्नी

जाहिराती तर विचारुच नकापण या सगळ्यात वरकडी कुणाची तर आपले सरकार !!

म्हणे चलिए नयी आजादी की और !!!

कोट्यावाधी रुपये खर्चं करून ? ते ही आमचे ?आणि म्हणजे इतकी वर्षं आम्हाला गुलामीत ठेव्ल्याची जाहिरात देवुन कबुली ?

वा रे सरकार !!! :)

Thursday, April 10, 2008

ओ बी सी डी ई एफ जी

आज सकाळी सकाळी वार्ता आली अणि सोबत अर्जुन साहेबंचा हसरा चेहरा !
बाकि बरयाच राजकारणी लोकांचा तोंडात मारल्यासारखा एक एक फोटो !
अर्जुन रावान्चं आरक्षण झालं पुढच्या निवडनुकीसाठी :) :)
आजच कचेरीत येता येता एक गाणं कानावर आलं

ज़रा ज़रा किस मी किस मी किस मी, ज़रा ज़रा टच मी टच मी टच मी

अरे म्ह्णलं हां काय प्रकार आहे ? संध्याकाळी घरी टीवी चालू केल्यावर परत तेच!
एक झिप्र्या ते कसं बनवलनीत ते सांगत होता
त्याचं नाव काय तर म्हणे प्रीतम ! बार !!
अन मग आता गाणं बघा म्हणे, बघतो तर काय ! बाप रे बाप रे
एक बाई नुसत्या नाड्या नाड्या घालून आली अणि लागलीo नाचायलाo !

ज़रा ज़रा किस मी किस मी किस मी, ज़रा ज़रा टच मी टच मी टच मी
ज़रा ज़रा होल्ड मी होल्ड मी होल्ड मी, ज़रा ज़रा
ओ ओ ???
ओ ?? ओ ओ ओ ? काय ओ ओ ?

शिंचं म्हणजे काय ?

एक अजुन असलाच गण पुढे लाव्लन त्याने
बेबीआय लवयू असं कहीसं सारखं सारखं म्हणत होता
आता कुठली ही बेबी ? आणि मग एकदम
वो ओ ओ ओ ओ ओ जानेजा दोनों जहाँ मेरी बाहोमें आ
आता माला समजेना हे दोनों जहाँ मधे कुठून आलं ?

मी आपलं नुकतंच जीहाले मस्किन मुकुंन -बा-रंजिश बहाल-ऐ-हिजरा बेचारा दिल हैं
चा अर्थ लावान्याच्या प्रयत्नात असताना हा झिप्रा म्हणतो याव अणि त्याव

सध्या गीत लिहिनारे वाशिल्याचे लोक असतात की हे झिप्रे स्वताहाच लिहितात ?
काहीतरी गड़बड़ आहे हो !
श्री ग णे शा य न म हा

एकान्दरिताच या गूगल वाल्यान्ना शुद्धलेखन येत नाहीसं दिसतं !
म्हान्ला सुरुवात करावी मराठी ब्लोग्गिंग ला तर shree श्रीसारखा टाइप होतोय.

असो
अरे अरे ठीक आहे गड़बड़ होती ब्राउजर ची

गणपती बाप्पा मोर्या